'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Updated: Oct 19, 2016, 04:23 PM IST
'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम title=

मुंबई : ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काल चित्रपटाचा निर्माता करण जोहर यानं यापुढे पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही, पण सध्याचा ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ द्या असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत विरोध कायम ठेवण्याचा निर्णय झालाय. दरम्यान आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमाच्या मालकांना हा चित्रपट रिलीज करून नका असा आवाहन वजा इशारा दिला आहे.