ye dil he mushkil

ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन

ऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

Nov 7, 2016, 07:51 PM IST

'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये

पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.

Nov 1, 2016, 12:15 PM IST

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

Oct 23, 2016, 07:57 AM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST