गौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट...

दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Oct 19, 2016, 03:56 PM IST
गौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट... title=

मुंबई : दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय. 

या टिझरमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत शाहरुख खानही दिसतोय. आलियाला समुद्राशी कबड्डी खेळायला तो शिकवतोय. 

आलिया आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पुरुषांना भेटत जाते आणि तिचं आयुष्य एक आकार घेत जाते... असं या सिनेमाचं काहीसं कथानक... 

या सिनेमात कुणाल कपूर, आदित्य चोप्रा, अंगद बेदी यांच्याही भूमिका दिसतील. गौरी खान आणि करण जोहर हे दोघे या सिनेमाचे को-प्रोड्युसर आहेत.