मुंबई: 'क्वीन' चित्रपटातील हिट गाणं 'लंदन ठुमकदा' गाणारा गायक लभ जंजुआच्या घरात संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. बॉलिवूडच्या या हिट सिंगरचा मृतदेह त्याच्याच बेडरूममध्ये सापडला.
गोरेगावच्या बंगूरनगरमध्ये गायक लभ जंजुआच्या घरी जेव्हा त्यांची मोलकरीण पोहोचली. तेव्हा तिला त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला. या घटनेनंतर जंजुआचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आलं. पोलीस त्यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत आहे. मृत्यूचं कारण काय याचा शोध अजून लागला नाही.
लभ जंजूआ यांनी नुकताच हिट चित्रपट 'सिंग इज ब्लिंग'चं प्रसिद्ध गाणं 'दिल करे चूं चैं चैं चैं' गायलं. याशिवाय बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटातील हिट गाणी त्यांनी गायली होती. क्वीन, देव डी, सिंग इज किंग, बँड बाजा बारात, गरम मसाला, पार्टनरमधील जबरदस्त गाणी गायली.
लभ जंजुआंनी गायलेलं हे प्रसिद्ध गाणं-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.