अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की...

स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीत काही दिवसांपासून काहीतरी बिघडल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळात सुरु आहेत.

Updated: Oct 21, 2015, 11:37 PM IST
अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की...  title=

नवी दिल्ली : स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीत काही दिवसांपासून काहीतरी बिघडल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळात सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या रिलेशनशीपबद्दल कधीही जाहीरपणे न बोलणारी अनुष्कानं आपल्या नात्याला खूप सीरियसली घेतलंय. ती विराटसोबत लवकरच विवाहबंधनात अडकण्याची स्वप्न पाहतेय. 

पण, विराट... त्याला मात्र आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचंय... त्यामुळे तो थोडा चिल् आहे... आणि त्यामुळेच त्यानं आपलं विवाहाचा विचारही पुढे ढकललाय. 

यामुळेच अनुष्का त्याच्यावर चिडलीय. याचमुळे, विराटसोबत हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या लग्नातही न जाण्याचा निर्णय तिनं घेतलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, आपल्या नात्याला खूप गंभीरतेनं घेणाऱ्या अनुष्कानं काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये असताना लव्ह लॉक ब्रिजवर विराट आणि आपलं नावही लिहिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.