कॉमेडी नाईट्समध्ये कपिलच्या जागी कृष्णा अभिषेक?

काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होणार असल्याची बातमी आली होती. 

Updated: Dec 31, 2015, 10:59 AM IST
कॉमेडी नाईट्समध्ये कपिलच्या जागी कृष्णा अभिषेक? title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होणार असल्याची बातमी आली होती. नव्या वर्षात १७ जानेवारी रोजी या शोचा अखेरचा एपिसोड असणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा शो बंद होणार नसल्याचे वृत्त आले आहे. या शोमध्ये कपिलची जागी दुसरे कोणीतरी निवेदन करणार असल्याचे बोलले जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, या शोचे निवेदन कपिल शर्माच्या जागी कॉमेडियन कृष्णा अभिषेक करणार असल्याची माहिती आहे. कृष्णा कलर्स चॅनेलचा आणखी एक कॉमेडी शो कॉमेडी नाईट्स बचाओ या शोमध्ये निवेदन करत आहे. 

कृष्णाच्या या शोमुळेच कपिल चॅनेलवर नाराज आहे. कृष्णाच्या नव्या शोला चॅनेल अधिक प्रोमोट करत असल्याचे कपिल आणि त्याच्या टीमचे म्हणणे आहे.