खान त्रिमूर्ती: सलमान, आमिर, शाहरूख खान चित्रपटात एकत्र?

खान त्रिमूर्ती एकत्र दिसणार... हो एका प्रसिद्ध निर्मात्यामुळं हे शक्य होणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानला एकाच फिल्ममध्ये एकत्र आणण्याचं प्लानिंग करतोय.

Updated: Jun 1, 2015, 11:33 AM IST
खान त्रिमूर्ती: सलमान, आमिर, शाहरूख खान चित्रपटात एकत्र?  title=

मुंबई: खान त्रिमूर्ती एकत्र दिसणार... हो एका प्रसिद्ध निर्मात्यामुळं हे शक्य होणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानला एकाच फिल्ममध्ये एकत्र आणण्याचं प्लानिंग करतोय.

खान त्रिमूर्तीसह याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निर्माता स्वत: चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. साजिद समोर हे एक मोठं आव्हान असणार आहे, कारण तिन्ही खानला एकाच स्क्रीनवर समसमान काम देणं हे त्याच्यासाठी आव्हान असेल. सलमान, आमिर, शाहरूख या तिघांचेही खूप फॅन्स आहेत. त्यामुळं प्रत्येकाच्या फॅन्सला न्याय देणं गरजेचं असेल.

शाहरूख आणि सलमान खाननं यापूर्वी एकत्र तीन चित्रपट केले आहेत. पण तिघं एकत्र कधी मोठ्या पडद्यावर आले नाहीत. सलमान आणि आमिरनं १९९०च्या दशकात प्रेम आणि अमरची भूमिका साकारत, राजकुमार संतोषींचा चित्रपट 'अंदाज अपना अपना'मधून धूम केली होती. 

जर नाडियाडवाला या तिन्ही खानला एकत्र आणण्यात यशस्वी झाला. तर हा बॉलिवूडमधील सर्वात हेवीवेट्स चित्रपट असेल. बॉक्स ऑफिससाठी हा एक जॅकपॉटच असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.