राखी सनीला का म्हणतेय 'भारतातून चालती हो'!

सनी लियोन बॉलीवूडमध्ये आल्यानंतर राखी सावंतला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाहीय, यामुळे राखीचा नेहमीच सनीला पाहून तिळपापड होतो, सनी लिओनला चित्रपटांच्या ऑफर सुरूच आहेत, तर राखी सावंतला आयटम साँगसाठीही सध्या कुणी विचारत नाहीय. 

Updated: May 31, 2015, 10:04 PM IST
राखी सनीला का म्हणतेय 'भारतातून चालती हो'! title=

मुंबई : सनी लियोन बॉलीवूडमध्ये आल्यानंतर राखी सावंतला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाहीय, यामुळे राखीचा नेहमीच सनीला पाहून तिळपापड होतो, सनी लिओनला चित्रपटांच्या ऑफर सुरूच आहेत, तर राखी सावंतला आयटम साँगसाठीही सध्या कुणी विचारत नाहीय. 

सनी लियोनवर टीका केल्यानंतर मिळणाऱ्या प्रसिद्धीवरच सध्या राखी सावंतला समाधान मानावं लागतंय.

राखी सावंतने सध्या एक व्हिडीओ जारी केला होता, यात तिने सनी लिओनला तू भारतातून चालती हो, माझ्या फिल्म इंडस्ट्रीपासून तू दूर जा, मी राखी सावंत लीलाला गीला करण्यासाठी आली आहे, अशी अनेक वक्तव्ये राखीने केली होती. मात्र सनी लिओनने यावर राखीला कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.