कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!

अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय. 

Updated: Sep 17, 2016, 09:51 AM IST
कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव! title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय. 

प्रियदर्शनी अकॅडमीद्वारे सिने इंडस्ट्रीतल्या उत्कृष्ट योगदानासाठी कतरिनाला हा पुरस्कार देण्यात येमार आहे. १९ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. 

आत्तापर्यंत तन्वी आजमी, श्रीदेवी, मनीषा कोइराला, उर्मिला मातोंडकर, तब्बू, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोपडा यांनाही हा पुरस्कार मिळालाय. 

या इंडस्ट्रीत कतरिनानं जवळपास एक तप पूर्ण केलंय. तिचा नुकताच 'बार बार देखो' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकला... पण, तो काही प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही.

'स्मिता पाटील यांचा हा अपमान'

मंथन, भूमिका आणि अर्थसारखे अव्वल दर्जांचे सिनेमांवर आपली छाप सोडणाऱ्या स्मिता पाटील यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार कतरिनाला कशासाठी? असाही प्रश्न अनेकांना पडलाय. स्मिता पाटील यांचा हा अपमान असेल अशी तिखट आणि खोचक प्रतिक्रियाही काहींनी दिलीय.