सोनाक्षीसारखी सेम टू सेम, मिळाताहेत ऑफरवर ऑफर?

अनेक बॉलीवूड ताऱ्यांसारखी सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी एक तरूणी समोर आली आहे. आता ती सोनाक्षीपेक्षा कमी फेमस नाही. पण सोनाक्षी सारखी दिसत असल्यामुळे तिला अभिनयाच्या अनेक ऑफर मिळत आहेत. 

Updated: Apr 8, 2015, 08:51 PM IST
सोनाक्षीसारखी सेम टू सेम, मिळाताहेत ऑफरवर ऑफर?   title=

मुंबई : अनेक बॉलीवूड ताऱ्यांसारखी सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी एक तरूणी समोर आली आहे. आता ती सोनाक्षीपेक्षा कमी फेमस नाही. पण सोनाक्षी सारखी दिसत असल्यामुळे तिला अभिनयाच्या अनेक ऑफर मिळत आहेत. 

प्रिया मुखर्जी, असे या लंडनमधील तरूणीचे नाव असून प्रियाने नुकतेच इंस्टाग्राम या सोशल साइटवर एक फोटो शेअर केल्यानंतर ती खूप चर्चेत आली. या फोटोत तीने सोनाक्षी आणि तिचा फोटो टाकला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया मुखर्जीचे हे फोटो पाहिल्यानंतर तिला छोट्या पडद्यावरून अभिनयासाठी ऑफर मिळू लागल्या आहेत. सोनाक्षी सारखी दिसत असल्याने तिची डिमांड वाढली आहे. त्यामुळे आता प्रियाही भारतात शिफ्ट होऊ इच्छिते आहे. 

इटलीमध्ये जन्मलेली प्रियाची अभिनयात रूची आहे. ऑफर मिळाल्याने ती खूप उत्साहित आहे. सोनाक्षी सारखी दिसल्यामुळे मिळत असलेल्या ऑफरचा चान्स सो़डू इच्छित नाही. इंस्टाग्रामवर प्रियाने आपले नाव sonakshisinha_lookalike. असे ठेवले होते. आता तिने स्वतःचे नाव टाकले आहे. प्रियाचे अनेक फॅन्स आहेत आणि फोटोच्या माध्यमातून फॅन्सचे ती खूप मनोरंजन करते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.