दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले फोटोज झाले व्हायरल

मुंबई : हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स: द रिर्टन ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचे काही फोटो शेअर केलेत.

Updated: Feb 2, 2016, 12:31 PM IST
दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले फोटोज झाले व्हायरल title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स: द रिर्टन ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचे काही फोटो शेअर केलेत. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही दिसणार आहे.

या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज विनने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तो बाईकवर एका बिकिनी घातलेल्या अभिनेत्रीसोबत आहे. या हॉट फोटोची सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. 

यातील दुसऱ्या फोटोत तो सहकलाकारांसोबत चित्रपटाच्या सेटवर आहे. हा भन्नाट सेट पाहून आपण भारावले गेलो असल्याचे त्याने म्हटले आहे. यावरुन आपण कोणत्या प्रतीच्या कलाकारांसोबत काम करतो याची प्रेक्षकांना कल्पना येईल. त्याचा हा चित्रपट कमाल करेल असे मत त्याने व्यक्त केले आहे.

 

The Director, producers and myself sitting in wonder as we take in the artistry of the many craftsmen that have built...

Posted by Vin Diesel on Saturday, January 30, 2016