हेमा मालिनींचं बॉलीवूडमध्ये कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 'एक थी रानी  ऐसी भी' हा चित्रपट पूर्ण होत आला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमा मालिनी यांनी व्ट्विट करून ही माहीती दिली आहे. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आयुष्यावर आधारीत ही फिल्म आहे. विजयाराजे यांची भूमिका साकारण्यासाठी हेमा यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

Updated: Jul 16, 2016, 07:30 PM IST
हेमा मालिनींचं बॉलीवूडमध्ये कमबॅक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 'एक थी रानी  ऐसी भी' हा चित्रपट पूर्ण होत आला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमा मालिनी यांनी व्ट्विट करून ही माहीती दिली आहे. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आयुष्यावर आधारीत ही फिल्म आहे. विजयाराजे यांची भूमिका साकारण्यासाठी हेमा यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

शिंदे कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि स्वतः पूर्ण अभ्यास करून हेमा यांनी ही भूमिका साकारली आहे. रवी चोप्रा यांच्या बागबाननंतर त्यांनी नृत्य आणि राजकारणावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. पण आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. या फिल्मची निर्मिती राजमाता विजयाराजे स्मृती ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आली आहे.