मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानसह अभिनेत्री जुही चावलाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ही नोटीस पाठवलीय. 2008 मध्ये केकेआरनं मॉरिशियसच्या कंपनीला शेअर्स विकले होते.
या डीलमध्ये त्यांनी शेअर्सची किंमत कमी दाखवली होती. यात तब्बल 73.6 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा इडीला संशय आहे.
बाजारभावापेक्षा आठ ते नऊ टक्के कमी किंमतीनं हे शेअर विकले गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळं ईडीनं ही कारणे दाखवा नोटीस खान पती-पत्नी आणि जुही चावलाला पाठवलीय.