मुंबई : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधत झी युवावर अवधूत गुप्ते त्यांच्या संगीताची गुढी सरगममध्ये उभारणार आहेत. या आठवड्यात २९ मार्च आणि ३० मार्च ला सरगमच्या प्रेक्षकांना एक वेगळाच स्वरानुभव मिळणार आहे.
अवधूत गुप्ते हे नाव संगीत क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. ते उत्तम गायक तर आहेतच पण उत्तम संगीतकार, सुद्धा आहेत. त्याच बरोबर चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अश्या अनेक उपाध्या त्यांच्या नावासोबत आहेत. त्यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत सुद्धा देतात.
सरगम या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय जय महाराष्ट्र माझा हे गाजलेले गाणे गाणार आहेत. त्याच बरोबर कांदे पोहे, ही गुलाबी हवा, हे लंबोदर , ढिपाडी ढिपांग ही गाणी पहिल्या भागात तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल , रॉंग नंबर , आम्ही लग्नाळू , सखे तुझ्या नावाचं येडं लागलं , आणि परी म्हणू की सुंदरा ही गाणी गाणार आहेत . अवधूत त्यांचे सगळ्यात प्रसिद्ध गाणे ऐका दाजीबा आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात ऐकवणार आहेत. २९ आणि ३० मार्च बुधवार आणि गुरवार रात्री ९ हे प्रेक्षकांना गुढीपाडवाची भेट झी युवाकडून मिळणार आहे .