हृतिक आणि सलमान, आमिर पेक्षा सर्वांचं लक्षं आझादवर!

कुलाबा कोऑपरेज मैदानात आमिर खानची मुलगी इरानं एका फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. ही मॅच खास एका संस्थेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी होती, जी की प्राण्यांसाठी काम करते.

Updated: Jul 21, 2014, 07:25 PM IST
हृतिक आणि सलमान, आमिर पेक्षा सर्वांचं लक्षं आझादवर! title=

मुंबई: कुलाबा कोऑपरेज मैदानात आमिर खानची मुलगी इरानं एका फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. ही मॅच खास एका संस्थेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी होती, जी की प्राण्यांसाठी काम करते.


 

मग काय या चांगल्या कामासाठी आणि मिस्टर परफेक्शनिस्टच्या मुलीच्या मदतीसाठी बॉलिवूडचे बडे कलाकार मैदानात उतरले. मात्र फुटबॉल मॅचसाठी हृतिक रोशन, सलमान खान, आदित्य रॉय कपूर, सोहेल खान, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ आणि कुणाल कपूरची ही मैफिल इराच्या धाकट्या भावानं आझादनंच काबू केली. 


 

या मॅचसाठी जितकेही लोक मैदानात उपस्थित होते त्यांच्या मनोरंजनासाठी आझादनं सुद्धा फुटबॉलला किक मारली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.