Oscars 2025 Laapataa Ladies : ऑस्कर्स 2025 मध्ये किरण रावच्या लापता लेडीजला बसला फटका. बेस्ट इंटरनॅशनल फीचर कॅटेगरीत शॉर्टलिस्ट होणाऱ्यांच्या यादीत स्वत: चं स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरली. खरंतर, भारताशी संबंधीत असलेला दुसरा चित्रपट संतोष आहे. खरंतर हा यूकेमधील चित्रपट आहे आणि त्यात भारतीय अभिनेत्री असून हा शॉर्टलिस्ट यादीत सिलेक्ट झाला आहे. लापता लेडीज हा चित्रपट सिलेक्ट झाला नसल्यानं फक्त किरण आणि आमिर खान नाही तर संपूर्ण देश निराश झालं आहे. कारण या कॅटेगरीसाठी सगळेच फार उत्साही होते.
लापता लेडीजला सप्टेंबरमध्ये 97 अकादमी अवॉर्ड्सची ऑफिशियल एन्ट्रीसाठी निवडण्यात आलं. मंगळवारी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स एंड साइंसेजनं पुढच्या राउंडसाठी सिलेक्ट होणाऱ्या 15 चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यात किरण राव दिग्दर्शनात बनलेला लापता लेडीज शॉर्टलिस्ट होऊ शकला नाही. एकूण 15 चित्रपटांना पुढच्या राउंडसाठी निवडण्यात आलं. अकादमीच्या मेंबर्सनं हे सगळे चित्रपट पाहून त्यांना शॉर्टलिस्ट केलं आहे. त्यानंतर या चित्रपटांना पुन्हा एकदा पाहून ते एक फायनल राऊंडसाठी यादी काढतील.
आमिरचा चित्रपट यातून बाहेर झाला असला तरी यूकेकडून पाठवण्यात आलेल्या हिंदी भाषेत असलेल्या 'संतोष' हा पुढच्या राउंडसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला. चित्रपटाला ब्रिटिश इंडियन फिल्ममेकर संध्या सुरीनं दिग्दर्शन केलं आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी देखील आहे. ऑस्कर्स 2025 च्या विजेत्यांची घोषणा ही 2 मार्च रोजी होणार आहे.
1. ब्राझिल - आय एम स्टिल हेयर
2. कॅनडा - यूनिव्हर्सल लॅन्गवेज
3. चस्का प्रजासत्ताक - वेव्स
4. डेनमार्क - द गर्ल विद द नीडल
5. फ्रान्स - एमिलिया पेरेज़ (Emilia Pérez)
6. जर्मनी - द सीड ऑफ द सेक्रेड फिग (The Seed of the Sacred Fig)
7. आइसलॅन्ड - टच
8. आयरलॅन्ड - नीकैप
9. इटली - वर्मीग्लियो
10. लातविया - फ्लो
11. नॉर्वे - आर्मंड (Armand)
12. फिलिस्तीन - फ्रॉम ग्राउंड झीरो
13. सेनेगल - दाहोमी
14. थाईलॅन्ड - हाउ टू मेक मिलियन्स बिफोर ग्रैंडमा डाइस
15. यूनाइटेड किंगडम - संतोष
'लापका लेडीज' हा चित्रपट 1 मार्च 2024 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 5 कोटींचा बजेट असणाऱ्या या चित्रपटानं भारतात 20.58 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाइड या चित्रपटानं 27.06 कोटींची कमाई केली.