मुंबई : अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या चौरंगा या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हाच त्याच्या चर्चा सुरू झाल्या. जाती व्यवस्थेवर आधारित असणारा हा सिनेमा एका खऱ्याखुऱ्या घटनेशी संबंधित आहे. ट्रेलर रिलीज होताच त्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.
चौरंगा हा सिनेमा २००८ साली झारखंडमध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. यामध्ये दलित समाजातील मुलगा गावातील एका ब्राम्हण जातीच्य़ा मुलीला प्रेम पत्र लिहितो. त्यानंतर त्या मुलीच्या घरचे लोक त्या मुलाची हत्या करतात.
सिनेमामध्ये संजय सुरी, तनिष्ठा चॅटर्जी, सोहम माएत्रा, अर्पिता चॅटर्जी, अॅना शाहा आणि आंशुमन झा यांची प्रमुख भूमिका आहे.
पाहा व्हिडिओ