व्हिडिओ : रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेल्वेट'चा ट्रेलर

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे. 

Updated: Mar 19, 2015, 11:11 AM IST
व्हिडिओ : रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेल्वेट'चा ट्रेलर title=

मुंबई : अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे. 

या सिनेमात रणबीर कपूर एका स्ट्रीट फायटरच्या तर अनुष्का एका जॅझ सिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं कथानक १९६० च्या दशकावर आधारलेलं आहे. 

या सिनेमाचं वैशिष्ट म्हणजे या सिनेमात आत्तापर्यंत दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसलेला करण जोहरही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा १५ मे रोज प्रदर्शित होणार आहे.

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.