'आमिर सलमानची बरोबरी कधीच करू शकणार नाही'

अभिनेता आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी तो दबंग सलमान खानची मात्र कधीच बरोबरी करू शकत नाही... असं आमचं नाही तर खुद्द आमिर खानचंच म्हणणं आहे.

Updated: Mar 19, 2015, 08:49 AM IST


फाईल फोटो

मुंबई : अभिनेता आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी तो दबंग सलमान खानची मात्र कधीच बरोबरी करू शकत नाही... असं आमचं नाही तर खुद्द आमिर खानचंच म्हणणं आहे.

आमिरच्या म्हणण्यानुसार, तो कधीच सलमान खान बनू शकत नाही. 'सलमान ज्या पद्धतीनं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा आणि डान्सचा जलवा उतरवू शकतो ते सगळं करणं माझ्या मात्र कुवतीबाहेरचं आहे. सलमान ज्या प्रकारचे सिनेमे करतो त्या पद्धतीचे सिनेमे मी मात्र इच्छा असूनही करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या आवडी-निवडीवर अवलंबून असतात' असं आमिरनं म्हटलंय. 

आमिर म्हणतो, ज्या भूमिका सलमानला पसंत पडतात, जरुरी नाही की त्यामध्ये मलाही भावतील. कधी-कधी मी जेव्हा दबंग सिनेमातील सलमानची लोकप्रिय डान्स स्टेप बघतो तेव्हा मी हैराण होऊन जातो. तसं करण्यासाठी माझंही मन असतं. पण, मग मला असंही जाणवतं की मी मात्र सलमानच्या दबंगसारख्या सिनेमात एखादी महत्त्वाची भूमिका निभावू शकेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.