अभिनेत्रीचा बाथरुममधील 'तो' Video Viral होण्यामागील खरं कारण आलं समोर; अभिनेत्री म्हणाली, 'तरुणींने...'

Bollywood Actress Bathroom Video: कायम चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, अशातच आता तिने या व्हिडीओसंदर्भात खुलासा केलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 09:53 AM IST
अभिनेत्रीचा बाथरुममधील 'तो' Video Viral होण्यामागील खरं कारण आलं समोर; अभिनेत्री म्हणाली, 'तरुणींने...' title=
अभिनेत्रीनेच केला खुलासा

Bollywood Actress Bathroom Video: अभिनेत्री उर्वशी रौतेला ही मागील वर्षी सातत्याने चर्चेत राहिल्याचं दिसून आलंय. त्यातही तिचा बाथरुममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून आलं. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने हा व्हिडीओ म्हणजे 'घुसपेठीया' चित्रपटातील एक दृष्य असल्याचा दावा केला होता. मात्र आता याच व्हिडीओबद्दल उर्वशीने एक नवीन दावा केला आहे.

...म्हणून व्हायरल केला व्हिडीओ

उर्वशीने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्हायरल झालेल्या बाथरुममधील व्हिडीओसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 'घुसपेठीया' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली परवानगी घेऊनच हा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल केला होता, असा दावा उर्वशीने केला आहे. 'घुसपेठीया' चित्रपटाचे निर्मात्यांवर कर्ज असल्याने त्यांनी या नव्या चित्रपटाची चर्चा व्हावी या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता, असं उर्वशीने म्हटलं आहे. निर्मात्यांवर एवढं मोठं आर्थिक संकट आलं होतं की त्यांना त्यांची जमीन विकावी लागली असती. ही परिस्थिती लक्षात घेऊन मीच त्यांना हा सीन लिक करण्यासाठी परवानगी दिली, असं उर्वशी म्हणाली.

तरुणींना संदेश देण्याचा प्रयत्न

"त्यांच्यावर काही कर्ज होतं आणि कर्ज फेडताना ते अडचणीत आलेले. त्यांना त्यांची जमीन विकावी लागली असती. ते रस्त्यावर आले असते. त्यामुळे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या बिझनेस मॅनेजरबरोबर यासंदर्भात चर्चा करुन पुढचा निर्णय घेतला," असं उर्वशीने म्हटलं आहे. "त्यांनी आमची परवानगी घेऊन व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडीओ चित्रपटामधलाच होता. आम्ही तो व्हायरल करण्यापूर्वी किंवा तो शूट करण्यासाठी काही वेगळे कष्ट घेतले नाहीत. आपण हा व्हिडीओ आधीच व्हायरल केला तर चित्रपटाची चर्चा होईल असं निर्मात्यांचं म्हणणं होतं. या माध्यमातून जागृती निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला. खास करुन तरुणींने सतर्क राहण्याचा संदेश यातून देण्याचा आमचा उद्देश होता," असं उर्वशीने म्हटलं आहे. 

कधी रिलीज झालेला हा चित्रपट?

'घुसपेठीया' हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तमिळमधील 'थिरुतू पायली 2' या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटामध्ये उर्वशीबरोबरच अक्षय ओबेरॉय, विनित कुमार सिंह आणि गोविंद नामदेव झळकले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@urvashirautela)

सैफवरील विधानावरुन ट्रोल

दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबद्दल बोलताना उर्वशीने तिच्याकडील हिरे आणि संपत्तीसंदर्भात केलेल्या भाष्यावरुन ती ट्रोल झाली आहे. यानंतर उर्वशीने माफी मागितली असली तरी तिने केलेल्या विधानावरुन टीकेची झोड उठवली आहे.