औरंगाबाद : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय-अतुल यांच्यावर तीव्र टीका केली आहे. अजय-अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण केलेली मदत ते विसरलेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत, अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.