गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!

सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. 

Updated: May 26, 2016, 06:54 PM IST
गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'! title=

मुंबई : सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. 

सतीश राजवाडे दिग्दर्शित आगामी चित्रपटात आर्या पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. याअगोदर आपण गायिका केतकी माटेगावकर हिला अभिनेत्रीच्या रुपात पाहिलंच आहे... तिचा अभिनयही पाहिलाय... आता आर्या अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवेल का? हेही लवकरच समजेल.


'लक्ष्या'चा अभिनय

सिनेमाचा हिरो - अभिनय बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे या सिनेमाचा हिरो असेल. अभिनयचादेखील हा पहिलाच सिनेमा असेल. अभिनयच्या 'भोग' या एकांकिकेनं प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली होती.