नवी दिल्ली : आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार नेहमीच अनोखे फंडे वापरत असतात. एअरलिफ्ट चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खिलाडीस्टार अक्षय कुमारनेही असाच काहीसा वेगळा फंडा वापरला.
मिशन सपने या कार्यक्रमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अक्षयने चक्क रस्त्यावर ऊसाचा रस विकला. जोधपूर येथील रस्त्यांवर अक्षयने लोकांना उसाचा रस विकला. यातून जे काही पैसे मिळाले ते विधवा महिला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
संपूर्ण दिवसात अक्षयने ऊसाचा रस विकून तब्बल १० हजार रुपयांची कमाई केली. मिशन सपने या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलाकार एक दिवस स्वयंमेहनत करुन गरजूंना मदत करतात.