अक्षयच्या 'एअरलिफ्ट'चा ट्रेलर लाँच

सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी 'एअरलिफ्ट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 'बेबी' आणि 'स्पेशल २६' साऱख्या धर्तीचा हा सिनेमा आहे.

Updated: Jan 3, 2016, 12:08 PM IST
अक्षयच्या 'एअरलिफ्ट'चा ट्रेलर लाँच title=

मुंबई : सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी 'एअरलिफ्ट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 'बेबी' आणि 'स्पेशल २६' साऱख्या धर्तीचा हा सिनेमा आहे.

एअरलिफ्ट हा सिनेमा १९०-९१ मध्ये इराक-कुवैत युद्धादरम्यान भारतीय मायदेशात कसे परतले याचा प्रवास दाखवणारा आहे. १९९०मधील वास्तविक घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. यात अक्षयने एका कुवैतमध्ये राहणाऱ्या बिझनेसमन रंजीतची भूमिका केलीय. अक्षयसह निमरत कौर प्रमुख भूमिकेत आहे. 

२२ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. राजा कृष्णा मेनन यांनी याचे दिग्दर्शन केलेय.