कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.

Updated: Jan 2, 2016, 10:01 PM IST
कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा title=

मुंबई : कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.

कपिल शर्माच्या जागी नवा अँकर येत असल्याने अनेकांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्ती केली आहे. त्यामुळे चॅनेलने नवा शो सुरू करण्याचं ठरवलं आहे. ज्याचं नाव असणार आहे कॉमेडी नाईट्स बचाव.

नव्या शोचं होस्टींग त्याचेच जुने सहकारी करतील. सध्या कॉमेडी सर्कस मधील कपिलचे प्रतिस्पर्धी गोंविदा याचा भाचा कृष्णा अभिषेक हे या शोचं होस्टींग करत आहे. शिवाय भारती, सुदेश लेहरी, करन वाही यासारखे स्टार्सही या शोमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. पण यामुळे कपिलचे फॅन नाराज झाले आहे.