व्हिडिओ : 'सरबजीत'...अंगावर काटा उभा करणारा ट्रेलर!

सत्य घटनेवर आधारीत 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा करण्यासाठी पुरेसा आहे. 

Updated: Apr 14, 2016, 03:58 PM IST
व्हिडिओ : 'सरबजीत'...अंगावर काटा उभा करणारा ट्रेलर!  title=

मुंबई : सत्य घटनेवर आधारीत 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा करण्यासाठी पुरेसा आहे. 

रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. रणदीपनं सरबजीतची भूमिका निभावलीय. या सिनेमात त्याच्या बहिणीच्या दलबीर कौरच्या भूमिकेत ऐश्वर्या दिसतेय तर पत्नीच्या भूमिकेत रिचा चड्ढा... या सिनेमात ऐश्वर्यावरून नजर हटवणं तुम्हाला कठिण जाऊ शकतं. 

हा सिनेमा सरबजीत सिंग या भारतीयाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जीवनावर आधारित आहे. कोणतीही चूक नसताना सरबजीतनं आपलं सगळं आयुष्य पाकिस्तानातल्या एका तुरुंगात काढलं... त्यानंतर भारतात आली ती त्याच्या मृत्यूची बातमीच...