Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळतेय. शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याच्या वाढ झाली आहे. तर, चांदीलादेखील झळाळी आली आहे. चांदी पुन्हा एकदा 90 हजारांच्या वर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 20 डॉलरने वाढून 2650 डॉलर इतके होते. तर, चांदी 30 डॉलरच्या वर दिसली होती. MCXवर आज सकाळी 10च्या सुमारास सोनं 270 रुपयांनी वधारलं आहे. चांदीदेखील या दरम्यान 279 अंकांनी तेजीत आली आहे. त्यामुळं चांदीचे दर 89.915 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली असून सोनं 78,000 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून सोनं 71,500 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झालं असू प्रतितोळा सोनं 58,500 रुपयांवर पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 78, 000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,150 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,800 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 850 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,200रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,400 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,800 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71, 500 रुपये
24 कॅरेट- 78, 000 रुपये
18 कॅरेट- 58,500 रुपये