'उडता पंजाब' मधील करिनाचा आणि शाहीद कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित

या सिनेमात करिना कपूर खान ही डॉक्टर शिवानी गुप्ताची भूमिका साकारत आहे. त्या पोस्टरमध्ये करिना कपूरला डॉक्टरच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. त्याच चित्रपटामधील हा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

Updated: Apr 14, 2016, 03:35 PM IST
'उडता पंजाब' मधील करिनाचा आणि शाहीद कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित title=

मुंबई : या सिनेमात करिना कपूर खान ही डॉक्टर शिवानी गुप्ताची भूमिका साकारत आहे. त्या पोस्टरमध्ये करिना कपूरला डॉक्टरच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. त्याच चित्रपटामधील हा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

काय आहे शाहीदचं नाव
तसेच नुकताच शाहीद कपूरचा देखील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलायं  ज्यामध्ये तो 'रॉकस्टार' च्या भूमिकेत असून टॉमी सिंग असं त्याच नाव आहे.

तिसऱ्यांदा करिना डॉक्टरच्या भूमिकेत
'क्यों की' आणि 'थ्री इडियट्स' या चित्रपटांमध्ये देखील करिना कपूरने डॉक्टरची भूमिका बजावली होती. या चित्रपटामधील हे दोन्ही पोस्टर बघून प्रेक्षकांमधील उत्सुकता  वाढत आहे.

एक्स कपल पुन्हा एकदा एकत्र...
'जब वी मेट' या सिनेमानंतर त्यांचा 'मिलेंगे मिलेंगे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं म्हणून दोघांनीही या चित्रपटाचं प्रमोशन केले नाही. हा चित्रपट जब वी मेट पूर्वी मिलेंगे मिलेंगे चं शुटिंग पूर्ण झालं होतं. पण नंतर  तो रिलीज करण्यात आला. आता  बऱ्याच दिवसांनी  शाहीद-करिना ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच सांगायला गेल तर ब्रेकपनंतर  प्रथमच दोघे एकत्र काम करत असल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनच उत्सुकता वाढली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक चौबे आहेत. शाहीद आणि करिनासोबत या चित्रपटामध्ये आलिया भट, प्रभज्योत सिंग, दिलजीत दोसांझ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.