२२ तासांत ११० जणांनी केला माझ्यावर रेप

 जगात दररोज बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, अनेक महिला रोज याच्या शिकार होत आहेत. नुकतेच एका ब्रिटीश महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Updated: Jan 20, 2016, 09:06 PM IST
२२ तासांत ११० जणांनी केला माझ्यावर रेप title=

नवी दिल्ली :  जगात दररोज बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, अनेक महिला रोज याच्या शिकार होत आहेत. नुकतेच एका ब्रिटीश महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

या महिलेला ग्रीसच्या काही देह व्यापाऱ्यांनी विकल होते. तिला ६ वर्षांपर्यंत यौन संबंध ठेवण्यासाठी तिचा छळ करण्यात आला.  २५ वर्षीय मेगन स्टेफिनने सांगितले की आपल्या आईसोबत सुट्ट्यांमध्ये ग्रीसला गेली असता ती देह व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला. त्यावेळी मेगनचे वय फक्त १४ वर्ष होते. 

मेगनला रोज ५० व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जायचा. २२ तासांमध्ये ११० व्यक्तीसोबत सेक्ससाठी दबाव टाकला जात होता. 

मेगनने सांगितले की तिच्या बॉयफ्रेंडने तिलाा एका देहव्यापाऱ्याला विकले होते.  मेगने Bought & Sold with a ghostwriter नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात आपले वेदनादायक अनुभव सांगितले आहेत. ती कशी देहव्यापाऱ्यांपासून लपत असे आणि तिला शोधण्यासाठी देहव्यापारी कसे तिच्या घरच्यांना त्रास देत होते. 

तिला अनेक देहव्यापाऱ्यांनी विकले आणि खरेदी केले. डेली मेलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार तिच्या बॉयफ्रेंडने तिला विकले आणि ६ वर्ष ती वेश्या बनून राहिली. 

अनेक पुरूष विना कंडोम माझ्याशी सेक्स करत होते. मी नकार दिल्यावर ते जास्त पैसे देण्याचे बोलत असतं. कशी तरी मेगन त्या तस्करांच्या तावडीतून सुटून आपल्या मायदेशी आली.

मेगनने पुन्हा आपले आयुष्य सुरू केले तिला चर्चमध्ये एक व्यक्ती भेटला ती त्याच्यावर प्रेम करू लागली. त्यानंतर आता ती आपल्या प्रियकरासोबत चांगले जीवन व्यतीत करत आहे.