... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय. 

Updated: Aug 8, 2014, 05:31 PM IST
... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे title=

इंडोनेशिया: आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय. 

इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटावर डेव्हिड स्लेटर नावाचा फोटोग्राफर या दुर्मिळ प्रजातीच्या माकडाचे फोटो काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका माकडानं त्याचा कॅमेराच पळवला. एवढंच नव्हे तर त्या माकडाकडून नकळत कॅमेरा हाताळला गेला आणि त्यातून अनेक फोटो क्लिक झाले. त्यात माकडानं काढलेल्या सेल्फीचाही समावेश होता. आता या फोटोच्या कॉपीराइटवरून सध्या ऑनलाइन विश्वात मोठा वाद रंगलाय.

या फोटोग्राफरनं हा फोटो नेटवर टाकताच तो वणव्यासारखा जगभरात पसरला. विकीपीडियानं नुकताच हा फोटो आपल्या वेबसाइटवर टाकला, त्याला फोटोग्राफर डेव्हिड स्लेटरनं जोरदार आक्षेप घेतलाय. या फोटोचा कॉपीराइट आपल्याकडं असल्याचा स्लेटरचा दावा आहे. तर हा फोटो माकडानं काढला असल्यानं, या फोटोवर त्याचा कॉपीराइट आहे. पण प्राण्यांना कॉपीराइट लागू होत नसल्यानं हा फोटो कॉपीराइट फ्री आहे, असा विकीपिडीयाचा दावा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.