नवी दिल्ली : 12 वर्षांची कॅथरीन थोरनलेय शिंकण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहे... त्यामुळेच, दररोजची साधी साधी कामं करतानाही कॅथरीन वैतागून जातेय.
चालणं, बोलणं, खेळणं, शाळेत जाणं, इतकंच काय तर मित्रांसोबत मजा-मस्ती करणं या साध्या साध्या गोष्टीही कॅथरीनसाठी कठिण होऊन बसल्यात. झोपल्यानंतरही ती शिंकताना आढळते.
कॅथरीन प्रत्येक मिनिटाला जवळपास 20 वेळा शिंकतेय आणि दिवसाला जवळपास 12 हजार वेळा... या आजारातून सुटका करून घेण्यासाठी कॅथरीनच्या आई - वडिलांनी आजवर अनेक तज्ज्ञांचे उंबरठे झिजवलेत. परंतु, परिणाम शून्य...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.