फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थीनींवर करणार कारवाई

 ब्रिटनची स्वासिंया युनिवर्सिटीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 'सेक्स वर्कर प्रोजेक्ट' नावाचा सर्वे केला. त्यात युनिवर्सिटीच्या बहुतांशी स्टाफने ट्यूशन फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याची सूचना केली आहे. 

Updated: Aug 18, 2015, 02:06 PM IST
फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थीनींवर करणार कारवाई  title=

ब्रिटन :  ब्रिटनची स्वासिंया युनिवर्सिटीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 'सेक्स वर्कर प्रोजेक्ट' नावाचा सर्वे केला. त्यात युनिवर्सिटीच्या बहुतांशी स्टाफने ट्यूशन फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याची सूचना केली आहे. 

या नंतर युनिवर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशासाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये काही बाबी समोर आल्या. त्यानुसार शिक्षण सुरू असताना कोणताही विद्यार्थी स्कॉर्ट, ग्लॅमरस मॉडल किंवा पॉर्न स्टार होत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 

इंग्रजी वृत्तपत्र मिररने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेनुसार दोन युनिवर्सिटीने संकेत दिले की ते अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करणार आहे. अशा प्रकारांनी युनिवर्सिटीची प्रतिमा खराब होते. युनिवर्सिटीबद्दल चुकीच्या गोष्टी बाहेर जातात आणि त्यामुळे पोलीस युनिवर्सिटीत कारवाईसाठी येते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.