दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

Updated: Aug 17, 2015, 10:47 PM IST
दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा title=

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

मोदींचे दुबईतील भाषणातील ठळक मुद्दे 

दुबई  : दुबईतील भारतीयांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजीत कार्यक्रमातील भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे 

- लघू भारताचं दर्शन करतो आहे. 

- परिश्रमाची पराकाष्टा करून रोजगार निर्मिती करीत आहात, आणि भारताचा गौरव वाढविण्याचेही काम करीत आहात. - मोदी 

- तुमच्या आचरणामुळे भारताला गौरव वाटतो - मोदी 

- भारतात जास्त पाऊस झाल्यावर दुबईतील माझा भाऊ छत्री उघडतो - मोदी

- भारतात नैसर्गिक आपत्ती आली की दुबईतील भारतीयाची झोप उडते - मोदी 

- भारताने अण्विक परिक्षण केले होते, तेव्हा भारतावर आर्थिक निर्बंध लावले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी जगभरातील भारतीयांना आवाहन केले होते. त्यावेळी गल्फ मधील भारतीयांनी सर्वाधिक मदत केली होती. 

- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण दुबई नाचत होते - मोदी 

- भारताला सशक्त बनविण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे माझ्यासमोर बसले आहे - मोदी 

- दुबई लघु भारत नाही तर लघु विश्व बनले आहे - मोदी 

- थंड प्रदेशातील लोक या ४०-४५ डिग्री तापमानात राहणे पसंत करतात - मोदी 

- केरळमधून आलेला समुदाय मोठ्या संख्येतून आहे. केरळचा उल्लेख विशेष करून करतो की, आज केरळचे नववर्ष आहे. 

- मल्याळममधून दिली मोदींनी केरळवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा 

- भारतातून गल्फ देशांमध्ये आठवड्यात ७०० पेक्षा अधिक विमान वाहतूक होते - मोदी 

- दर आठवड्याला ७०० पेक्षा अधिक विमानं येतात, पण भारताच्या पंतप्रधानाला येण्यासाठी ३४ वर्ष लागली - मोदी 

- मागील सरकारने अनेक चांगली कामे माझ्यासाठी सोडली आहेत - मोदी 

- यातील सर्व अल मकदूम यांनी प्रेमाचा वर्षावर केला. मी त्यांच्या प्रेमाला विसरू शकत नाही - मोदी 

- मला पाच भावांसह एअरपोर्टवर घेण्यासाठी अल मकदूम आले होते - मोदी 

- हे प्रेम एका व्यक्तीला नाही, हे प्रेम सव्वाशे कोटी भारतीयांना आहे - मोदी 

- दुबईच्या राज्यांची मनपूर्वक अभिवादन करतो - मोदी 

- संप्रदायाच्या नावावर दहशतवादाचा खेळ खेळला जातो, पण अल मकदूम भारतीय समुदायासाठी मंदिरासाठी जागा देतात, जे लोक आबुधाबीशी परिचीत आहे, त्यांना माहित आहे की हा निर्णय किती मोठा आहे- मोदी 

- सर्व देश वासियांना क्राउन प्रिन्सचे अभिनंदन करा, उभे राहून अभिवादन करा - मोदी 

- दोन दिवसांच्या दौऱ्यात विश्वासाचे वातावरण निर्माण 

- दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याचे संकेत

- यूएईची भारतात साडे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

- दहशतवादाशी निगडित लोकांना शासन मिळण्याचे संकेत, समजणाऱ्याला इशारा काफी आहे - मोदी

- जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय

- भारतात FDIमध्ये ४८ टक्क्यांची वृद्धी

- भारतीय ४० वर्षांपासून दहशतवादाशी लढत आहे

-  बँकॉकमधील स्फोटाचा मोदींनी केला निषेध, दहशतवादावर घणाघाती टीका

- दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला सुनावलं, दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय.

- हिंसेच्या वाटेवर चालणारे नागालँडचे नागा बंडखोर ६०-७० वर्षांनंतर हिंसा सोडून मुख्यप्रवाहात आले

- १९४७पासून बांग्लादेशसोबत असलेला सीमावाद संपुष्टात आला

-  भारत-बांग्लादेश सीमावाद १ ऑगस्टपासून संपुष्टात, सर्व समस्यांवर उपाय चर्चेतूनच निघतात

- आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आज भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

-  शेजारी राष्ट्रांसाठी भारत धावून गेला, नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी भारत सर्वात मदतीला

- शेजारील श्रीलंकेला राजीव गांधींनंतर कोणीही गेला नव्हतं 

- शेजारील मालदीववर पाणी संकट आलं तेव्हा विमानानं पाणी पोहोचवलं

 - २०१६पर्यंत 'सार्क सॅटेलाईट' अवकाशात सोडण्याचा सार्क देशांचा मानस 

 - नेपाळ, भूतान, भारत, बांग्लादेश चारही देशांना कनेक्टिव्हिटीनं जोडणार

- देशाच्या आर्थिक विकासासाठी पूर्व भारताला सक्षम करणार, भारताला पूर्वेकडील देशांशी जोडणार

- पाच वर्षाच्या आत भारतात सर्व भागात २४ तास वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करत असून तो आम्ही पूर्ण करणार - नरेंद्र मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.