२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप

दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.

Reuters | Updated: Oct 28, 2015, 05:30 PM IST
 २९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप title=

सेऊल : दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.

दक्षिण कोरियात हा पहिली घटना आहे. वैवाहिक संबंधात एखाद्या महिलेने पतीवर रेप केल्याचा आरोप ठेवून खटला चालविण्यात येत आहे. २०१३ मध्ये दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक संबंधांत रेपला गुन्हा असल्याची मान्यता दिलेय. सियोल सेंट्रल प्रॉसिक्यूटर्स कार्यालयाने महिलेवर आरोप ठेवलाय की पतीला घरात जबरदस्तीने बंद करणे आणि सेक्स करण्यास दबाव टाकलाय. योनहाप न्यूज एजेंसीच्या वृत्तानुसार महिलेने पतीबरोबर सेक्ससाठी जबदरस्ती करण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न घटस्फोटासाठी एक मजबूत पुरावा असू शकतो.

दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्ये खालच्या न्यायालयाने पत्नीवर रेप करणाऱ्या व्यक्तीला कैदेची शिक्षा ठोठावली. तर वैवाहिक संबंधांत रेपला गुन्हा ठरविण्यास मंजुरी दिली होती. यावर्षी दक्षिण कोरियात रेपबाबत पहिली महिला आरोपीला न्यायालयाने आरोपातून मुक्त केलेय. ४५वर्षीय महिलेने कबुली दिली, मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला बांधले आणि त्याच्या हातावर हल्ला केला. मात्र, रेप करण्याचा विचारही नव्हता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.