कँडी क्रश सागाने तुमचे आयुष्य होऊ शकते उद्धवस्त - दहा कारणे

तुम्ही कँडी क्रश खेळतात... तर सावधान... कँडी क्रश खेळण्याने तुमचे आयुष्य कसे उद्धवस्त होते याचे आम्ही तुम्हांला दहा कारण सांगणार आहोत. 

Updated: Jul 8, 2016, 04:52 PM IST
कँडी क्रश सागाने तुमचे आयुष्य होऊ शकते उद्धवस्त - दहा कारणे  title=

मुंबई : तुम्ही कँडी क्रश खेळतात... तर सावधान... कँडी क्रश खेळण्याने तुमचे आयुष्य कसे उद्धवस्त होते याचे आम्ही तुम्हांला दहा कारण सांगणार आहोत. 

१) सोपा गेम :  हा गेम खेळण्यास सोपा आहे, त्यामुळे कोणीही खेळू शकतं. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही... 

2) गेमचे व्यसन होते - हा गेम खेळायला सोपा असल्यामुळे तुम्हांला त्याचे व्यसन जडते. तुम्ही हा गेम बंद करतात पण तुम्हांला आठवते की आपण ही लेव्हल पूर्ण केलेली नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा तो खेळायला लागतात. तुम्ही जशी लेव्हल कम्प्लिट करतात तसे तुम्हांला त्याचं अधिक व्यसन लागते. 

३) तुम्हांला निवड करण्याची सुविधा नाही - या गेममध्ये तुम्हांला फक्त पाच लाइफ असतात. त्या पाच लाइफ संपल्या त्यानंतर तुम्हांला ३० मिनीट थांबावे लागते. त्यामुळे तुम्ही अर्धा तास होण्याची वाट पाहतात आणि त्यामुळे कामात लक्ष राहत नाही. 

४) आव्हानात्मक - हा गेम आव्हानात्मक आहे पण सर्व चुकीच्या कारणांमुळे, तुम्ही ज्या ठिकाणी अडून राहतात त्या गोष्टी कायमच्या तिथेच असतात, त्यामुळे तुम्हांला ती लेव्हल एक ठराविक मूव्ह केल्यानंतरच पार करता येते. नाही तर तुम्ही त्याच अडकू बसतात आणि अस्वस्थ होतात.. 

५) संगीत - या गेमचे संगीत तुम्हांला वेडं करते. गेमच गाणं विचित्र नाही तर प्रत्येक गाण हे १५ सेकंद लांब आहे आणि ते रिपीट होते. 

६) स्पर्धा निर्माण करतो - कँडी क्रश मॅपमध्ये तुम्हांला दिसते की तुमचे मित्र कुठे आहेत. ते जर पुढे असतील तर त्यापर्यंत पोहण्यासाठी तुमची चढाओढ सुरू असते आणि ते जर तुमच्या मागे असतील तर ते आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी तुमच्या प्रयत्न असतो. हा तुमच्या रोजच्या बोलण्यातील विषय होतो. तू कशी ही लेव्हल पार केली. तू खूप मागे आहेस. अशामुळे तुमच्यात इर्षा निर्माण होते. 

७) स्पॅम मेल पाठविले जातात - तुम्हांला तुमच्या लाइफ संपल्यानंतर तीन तिकीट मिळविण्यासाठी ३ फेसबूक फ्रेंडला रिक्वेस्ट पाठवावी लागते. त्यामुळे तुम्ही किती जरी स्पॅम मेलला हेट करतात तरी या गेमसाठी स्पॅमर होतात. 

८) कँडी क्रश तुमच्याकडून पैसे मागतं - तुम्हांला जर ती तिकिट पाहिजे असतील, तुम्हांला स्पॅम पाठवायचा नसेल तर तुम्हाला तिकीट ऑनलाइन विकत घ्यायला सांगतात.  एखाद्या लेव्हलमध्ये तुम्ही अडकले असाल आणि ती पार करण्यासाठी तुम्हाला स्पेशल तिकीट घ्यावे लागते, ते ३० डॉलरपर्यंत महाग असू शकते. 

९) तुम्ही कधी सर्व लेव्हल पूर्ण करू शकत नाही - कँडी क्रशच्या पूर्ण लेव्हल तुम्ही कधीच पार करू शकत नाहीत. तुम्ही ३०० लेव्हल पार केल्या तरी पुढे मेसेज येतो की अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे क्रिएटर अजून काम करतात. 

१०) सत्य तुमच्या लक्षात येते - कधी ना कधी तुम्हांला लक्षात येते की कँडी क्रश हे दृष्ट चक्र आहे. ही घाण सवय आहे. एक व्यसन आहे. तुम्हांला तुमचे मित्र सल्ला देतात कँडी क्रशची सवय कशी सोडवली पाहिजे. तुमचे कुटुंबिय म्हणतात तू पहिल्यासारखा राहिला नाही. यामुळे तुमचे संबंध खराब होतात. अखेर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारतात की मी कँडी क्रश सागा चा व्यसनी झालो आहे का तर उत्तर येतं होय...

तुमच्या पैकी अनेक जण आता कँडी क्रश खेळत असतील तर बंद करा आणि तुम्हांला कोणी फेसबूकवर रिक्वेस्ट पाठवली तर ही बातमी त्याला पाठवा... विसरू नका... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.