अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी!

सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.

Updated: Apr 6, 2016, 02:20 PM IST
अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी! title=

मनामा : सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.

'गल्फ न्यूज'नं दिलेल्या बातमीनुसार, नुकतंच १६ वर्षीय अली अल किस्सी या विद्यार्थ्यानं उत्तरी सौदी अरबच्या ताबुकमध्ये मंगळवारी धामधुमीत विवाह रचला. 

या सोहळ्यासाठी अलीचे शाळेतील मित्र, शिक्षक आणि नातेवाईक सहभागी झाले होते. 

शाळेच्या व्यवस्थापनानंही मग आपल्या विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी 'हनीमून सुट्टी' जाहीर करून टाकली. अलीला एका आठवड्याची सुट्टी शाळेनं मंजूर केलीय. शिवाय त्याची परीक्षाही पुढे ढकलण्यात आलीय.