सायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी

अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Apr 2, 2015, 09:17 PM IST
सायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी title=

वॉशिंग्टन : अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनच्या या हालचालींचा अभ्यास असणाऱ्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, चीनने आधीच्या खर्चापेक्षा सायबर युद्धनीतीवर २० ते ३० टक्के अधिक खर्च केला आहे. सायबर युद्धनीतीला बळ देण्यासाठी चीनने दीर्घकालीन सामरिक योजना बनविली आहे, असे त्यांनी सांगितले.

सायबर युद्धाची क्षमता बाळगणाऱ्या देशांमध्ये चीनची गणना केली जाते. चीनचा बदललेला खर्चाचा प्राधान्यक्रम म्हणजे संसाधनांची मोठ्या प्रमाणावर पुनर्मांडणी आहे असे वॉशिंग्टन टाइम्सने म्हटले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.