ढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते, व्हायरल होणाऱ्या या फोटो मागील हे आहे सत्य!

बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

PTI | Updated: Sep 14, 2016, 07:08 PM IST
ढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते, व्हायरल होणाऱ्या या फोटो मागील हे आहे सत्य! title=

ढाका : बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, बकरी ईदच्यावेळी जनावरांची कुर्बानी दिल्याने त्यांचे रक्त रस्त्यावर सांडले आणि रस्त लाल झालेत.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्या रस्त्यांवर रक्त दिसत आहेत, ते रस्ते जास्त करुन राजधानी ढाक्यातील आहेत. बांग्लादेशात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्यातच ड्रेनेज सिस्टम चांगली नव्हती. त्यामुळे कुर्बानी दिलेल्या जनावरांचे सांडलेले रक्त पाण्यात मिसळले. हेच पाणी गटार व्यवस्था चांगली नसल्याने रस्त्यावरून रक्त मिसळलेले पाणी वाहू लागले. मात्र, रक्ताचे लाल पाणी असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.