www.24taas.com,लंडन
तमिळ टाइगर्स अर्थात लिट्टे या दहशतवादी संघटनेचा प्रमुख प्रभाकरण याचा १२ वर्षांचा मुलगा बालचंद्रन यांच्या हत्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एका इंग्रजी दैनिकांने दिलेल्या वृत्तानुसार बालचंद्रन याची हत्या गोळ्या घालून करण्यात आली.
प्रभाकरणच्या बालचंद्रन या मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याला स्नॅक खायला दिले होते. त्यानंतर त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येचे एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेय. श्रीलंकन सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लिट्टेच्या प्रभावाखाली असलेल्या भागात ऑपरेशन सुरू होते. यावेळी दोन्ही बाजूने फायरिंग करण्यात आली. यावेळी १२ वर्षीय बालचंद्रन मारला गेला. मात्र, लंडन येथील एका वृत्तपत्राने काही छायाचित्र प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिलेय.
श्रीलंकन सेनेने बालचंद्रन याला जिवंत पकडले होते. मात्र, त्यानंतर त्याला बंदुकीची गोळी घालण्यात आली. त्याआधी त्याला स्नॅक खायला दिले होते, असे लंडनच्या वृत्तपत्राने दावा केलाय. प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोत बालचंद्रन हा एका बंकरमध्ये बसलाय. त्यानंतर काहीवेळाने त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेला दाखवलाय. यावेळी त्याच्या छातीत गोळ्या घुसलेल्या आहेत. हे छायाचित्र २००९मध्ये घेतले गेल्याचे म्हटले गेले आहे.
हा फोटो एका चित्रपट निर्मात्याने काढल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेमध्ये लिट्टे आणि श्रीलंक लष्करामध्ये झालेल्या चकमकीत ७० हजार लोक मारले गेले होते. यातील हे छायाचित्र असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र, फॉरेंसिकच्या तज्ज्ञांना या फोटोची तपासणी केली त्यावेळी बालचंद्रनला पाच गोळ्या लागल्याचे दिसून आलेय. त्यामुळे प्रभाकरणच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याचे या वृत्तपत्राचा दावा आहे.