आपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं. 

Updated: Sep 28, 2014, 11:25 PM IST
आपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी  title=

न्यू यॉर्क:  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - 

  • मोदींसाठी 'MAD' झालं मँडिसन स्क्वेअर...

  • मोदींच्या सन्मानासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम... भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष..

  • मोदींचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन...

  • भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीतानं कार्यक्रम सुरू...

  • मँडीसन स्क्वेअरमध्ये मोदी... मोदी... मोदी... काय बोलतायेत ऐका मोदी...

  • साप-सपेरोंच्या देशाला तुम्ही प्रगत बनवलंय... मोदींनी केलं NRI चं कौतुक

  • इथे राहून तुम्ही देशाची शान - मोदी

  • माहिती तंत्रज्ञानानं भारताची इमेज बदलली

  • 'माऊस'च्या क्लिकवर आता दुनियेला नाचवतो भारतीय..

  • आता 'सापा'शी नाही तर 'माऊस'शी खेळतो

  • पंतप्रधानपदाचं दायित्व स्वीकारल्यापासून १५ मिनिटांची पण सुट्टी घेतली नाही

  • भारतीय असे अजिबात वागणार नाही, ज्यानं तुमची मान खाली जाईल

  • जनतेच्या आकांक्षा शतप्रतिशत पूर्ण करणार

  • भारतात परत यायचं असेल तर लवकर या, मोदींचं NRIला आवाहन

  • 21वं शतक आशियाचं... भारताचं...

  • भारताजवळ हे सामर्थ्य आहे आणि आता संयोग पण आहे...

  • आज भारत जगातील सर्वात तरूण देश आहे...

  • जुनी संस्कृती असलेला देश...  

  • आपला देश खूप गतीनं पुढं जाईल, कारण देशात ६५ टक्के लोकसंख्या ३५ वयाच्या कमी आहे...

  • तीन शक्ती आहेत भारताजवळ ज्याच्यामुळं आपण जगात पुढं जाऊ - जनतेचा म्हणजेच देवाचा आशीर्वाद आहे...

  • १. लोकशाही

  • २. तरुणाई

  • ३. मार्केट

  • अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही

  • भारतीय जगातील प्रत्येक कोपऱ्यात वसलेले आहेत... 

  • भारतीय तरुणाला विकासाची आस

  • मोठ्या जोमानं देशाची वाटचाल सुरू

  • विकासाला जनआंदोलन करायला हवं

  • देशाची सेवा प्रत्येक कामातून करावा, प्रत्येक जण जे काम करतो, ते देशासाठी करतो, असंच करावं... 

  • तरुणांचं सामर्थ्य खूप... भारत जगातील असा देश जो पहिल्याच प्रयत्नात मंगळावर गेला...

  • भारत आणि अमेरिका दोन्ही देश मंगळावर बोलतायेत....

  • प्रत्येक गरीब व्यक्तीसाठी पंतप्रधान जन धन योजना लागू केली. प्रत्येकाचं बँक खातं काढलं... 

  • मोदींनी 'मेक इन इंडिया'साठी दिलं सर्वांना आमंत्रण

  • मोबाईल फोनद्वारे या योजनेसाठी, देशासाठी काही करू शकता... mygov.in या वेबसाइटवरही आपण सहभागी होऊ शकता...

  • सर्व कायदे जे कामाचं नाही ते सर्व कायदे बंद केले... गुड गर्व्हनर्स... सोपं आणि इफेक्टिव्ह हवं... त्यावर मोदी सरकारचा भर...

  • भारतात राबवली स्वच्छता मोहिम... टॉयलेट बनवण्याचं काम करणार... 

  • मी चहा विकत-विकत इथं पोहोचलोय... मी खूप छोटा माणूस आहे... म्हणून माझं मन छोटे-छोटे काम करायला आवडतं... छोटा आहे पण छोट्या-छोट्या लोकांसाठी मोठं काम करायची इच्छा आहे...

  • सोप्या गोष्टी करायच्या असत्या तर जनतेनं मला निवडून दिलं नसतं...

  • २ ऑक्टोबरला गांधींजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त गांधींजींना आपण स्वच्छ भारत द्यायला हवा 

  • १९२२मध्ये भारताला स्वतंत्र्यांचे ७५ वर्ष होतील, तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तीकडे राहायला घर हवं... 

  • जानेवारी २०१५मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतण्याला १०० वर्ष पूर्ण होतील, तो दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो... पुढील वर्षी २०१५मध्ये अहमदाबादमध्ये साजरा होणार आहे... 

  • पीआयओ कार्ड होल्डर असणाऱ्यांना आजीवन विसा दिला जाईल, मोदींची घोषणा

  • PIO आणि  OCI एक नवी स्कीमला एक करणार... अमेरिकन पर्यटकांसाठी व्हिसा ऑन Arrival देणार

  • आपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी

  • पंतप्रधान मोदींसाठी विशेष फिल्म... पाहा असा हा भारत... नमामी गंगे... विशेष...

 

 

 

Crowd at Madison Square Garden cheers PM Narendra Modi as he closes his speech #ModiAtMadison pic.twitter.com/LnQMthZ5UB

— ANI (@ANI_news) September 28, 2014

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.