चिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान संघटनेची पार्श्वभूमी

पाकिस्तानच्या पेशावर भागातील आर्मी स्कूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून १६० जणांचा बळी घेतलाय. यात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सात तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं ५००हून अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणा-या सहा तालिब्यानांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. 

Updated: Dec 16, 2014, 09:40 PM IST
चिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान संघटनेची पार्श्वभूमी title=

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावर भागातील आर्मी स्कूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून १६० जणांचा बळी घेतलाय. यात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सात तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं ५००हून अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणा-या सहा तालिब्यानांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. 

पाकिस्तानातल्या शाळेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान या संघटनेची पार्श्वभूमी नेमकी आहे तरी कशी, ते पाहूयात...

  • २००७मध्ये तहरीक-ए-तालिबान नावाच्या दहशतवादी संघटनेची स्थापना
  • बैतुल्लाह मसूदनं तयार केली तहरीक-ए-तालिबान संघटना
  • पाकिस्तानी सैन्याविरूद्ध 'डिफेंसिव जेहाद' सुरू
  • पाकिस्तानातील आदिवासी खैबर पश्तून भागात तालिबानचा प्रभाव
  • तहरीक-ए-तालिबानची 'पाकिस्तानी तालिबान' अशीही ओळख
  • अफगाणिस्तानात नाटो सैन्याविरूद्ध संघर्ष
  • स्वात खोऱ्यात लष्करी कारवाईविरोधात तालिबान्यांची जंग
  • तहरीक-ए-तालिबानमध्ये सुमारे ३५ हजार दहशतवादी
  • दक्षिणी वजिरीस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबानचं मुख्यालय
  • २००७मध्ये तहरीक-ए-तालिबानकडून बेनझीर भुट्टोंची हत्या
  • २००८मध्ये इस्लामाबादच्या मैरियट हॉटेलवर हल्ला
  • मे २०१०मध्ये अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर हल्ल्याचा प्रयत्न
  • २०१०मध्ये अमेरिकेकडून दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश
  • २०११मध्ये ब्रिटननं घातली तहरीकवर बंदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.