बोलणारी मैना राहणार ५० लाखांच्या पिंजऱ्यात

राज्य पक्षी पहाडी मैनेच्या संवर्धनासाठी एक पाऊल उचलण्यात आलंय. कांघाराउमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचा खर्च करून एक मोठा पिंजरा बनविण्याची तयारी सुरू आहे. या कामासाठी पार्कच्या अधिकाऱ्यांना प्रोजेक्ट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Updated: Dec 16, 2014, 08:29 PM IST
बोलणारी मैना राहणार ५० लाखांच्या पिंजऱ्यात title=
प्रातिनिधिक फोटो

जगदलपूर: राज्य पक्षी पहाडी मैनेच्या संवर्धनासाठी एक पाऊल उचलण्यात आलंय. कांघाराउमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचा खर्च करून एक मोठा पिंजरा बनविण्याची तयारी सुरू आहे. या कामासाठी पार्कच्या अधिकाऱ्यांना प्रोजेक्ट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

बस्तरमध्ये आढळणाऱ्या डोंगराळी मैनेचं शास्त्रीय नाव ‘गैकुला रिलीजिओसा पेनिनसुलारिस’ आहे. ही देशाच्या विविध ठिकाणी आढळणाऱ्या मैनेपेक्षा वेगळी आहे. ही कांगेर घाटी, गंगालूर, बारसूर किंवा बैलाडीच्या डोंगराळ परिसराशिवाय छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर गुप्तेश्वर क्षेत्रात आढळते. म्हणून त्याला राज्य पक्षी घोषित केलं गेलंय. 

नुकत्याच काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरातील मैनेची अवैध शिकार झाल्यामुळं त्यांची संख्या खूप कमी झालीय. काही दिवसांपूर्वी वन विभागानं कोटवारपारामध्ये ३० मैनांचा थवा पाहिला होता म्हणून अधिकाऱ्यांचं लक्ष त्यांची संख्या वाढीकडे आहे.  

संपत चाललेल्या मैनेच्या या प्रजातिचं संवर्धन करण्यासाठी १९९२पासून प्रयत्न केले जात आहेत. पहिले ९० हजार रुपये खर्चून वन विद्यालयात असा पिंजरा बनवला गेला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.