मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे. 

Updated: Feb 11, 2016, 08:15 PM IST
 मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल  title=

कराची : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी ते आपल्या परिवारासोबत असताना अचानक बेशुद्ध झाले. त्यांनना कराचीच्या पीएनएस शिफा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. कडकोट सुरक्षा बंदोबस्तात त्यांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना काय झाले हे अजून समजू शकले नाही. 

डॉक्टरांची टीम मुशर्ऱफ यांच्या तब्येची काळजी घेतल आहे.  त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रिपोर्ट आल्यानंतर आता समजेल की ते बेशुद्ध का झाले होते. 

७२ वर्षीय मुशर्ऱफ तब्येत एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली होती. यापूर्वी २०१४ मध्ये हृदयासंदर्भातील आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोर्टात सुनावणी असताना त्यांची तब्येत बिघडली होती.