इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. मुशर्रफ यांनी नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलंय. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केलंय.
एकीकडे दोन्ही शेजारी देशांचं सरकार संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा वेळी मुशर्रफ यांचं हे विधान अनेकांना धक्कादायक वाटतंय. ‘नरेंद्र मोदी आता पंतप्रधान बनलेत पण त्यांनी काही अजून आपले पत्ते बाहेर काढलेले नाहीत’ असं म्हणतानाच मुशर्रफ यांनी मोदींवर प्लानिंगचा आरोप केलाय. ‘मोदी यांनी आत्तापर्यंत पाकिस्तान आणि मुस्लिमांबद्दल कोणतीही रणनीती पूर्णत: जाहीर केलेली नसेल तरीही ते काय करतात याकडे आमचं लक्ष असेलच’ असं मुशर्रफ यांनी म्हटलंय.
‘शेवटी पाकिस्तान हा 20 करोड लोकांचा देश न्यक्लिअर पॉवर आहे... भारत आणि मोदींना याबद्दल कोणतीही शंका नसावी’ असं मुशर्रफ यांनी चेतावण्याच्या सुरात म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, अनेकदा शस्त्रसंधी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान फ्लॅग मीटिंगसाठी एक पाऊल पुढे टाकलं असतानाच पाकच्या माजी राष्ट्रपतींचं हे विधान आलंय. तसंच काश्मीर मुद्द्यावर उत्तर मिळाल्याशिवाय दोन्ही देशांत कोणतीही चर्चा होणार नाही, असं पाकिस्ताननं जाहीर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.