इबोलाचं संक्रमण टाळण्यासाठी पाच गोष्टी

इबोला जगातील सर्वाधिक व्हायरस पैकी एक आहे, या व्हायरसचा सामना फ्लू व्हायरस प्रमाणे करता येत नाही, तज्ज्ञांच्या मते पाच सोप्या उपायांचा अवलंब केल्यास, या धोकादायक व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होवू शकतो.

Updated: Aug 27, 2014, 04:43 PM IST
इबोलाचं संक्रमण टाळण्यासाठी पाच गोष्टी title=

नवी दिल्ली : इबोला जगातील सर्वाधिक व्हायरस पैकी एक आहे, या व्हायरसचा सामना फ्लू व्हायरस प्रमाणे करता येत नाही, तज्ज्ञांच्या मते पाच सोप्या उपायांचा अवलंब केल्यास, या धोकादायक व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होवू शकतो.

1. साबण आणि पाणी
आपले हाथ नेहमी साबणाने आणि स्वच्छ पाण्याने धुवा, हात पुसण्यासाठी रूमाल वापरा, हा रूमाल स्वच्छ असला पाहिजे, व्हायरसला मारण्याचा हा सर्वात योग्य मार्ग आहे. यासाठी कोणत्याही विशेष साबणाची गरज नाही.

2. संक्रमित व्यक्तीला स्पर्श करू नका
जर एखाद्या व्यक्तीला इबोलाचं संक्रमण झालं असेल, तर अशा व्यक्तीला स्पर्श करू नका. हा व्हायरस  लघवी, मल, रक्त, उल्टी, घाम, अश्रू, शुक्राणू आणि योनीतून होणाऱ्या स्त्रावातून पसरू शकतो.

3. संक्रमित मृतदेहापासून दूर रहा
ज्या व्यक्तीचा मृत्यू इबोलाने झाला असेल अशा व्यक्तीच्या मृतदेहास हात लावू नका, कारण मृत शरीराच्या स्पर्शानेही हा व्हायरस पसरू शकतो, आजारी असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत मृताच्या शरीरातून हा व्हायरस मोठ्या प्रमाणात संक्रमण पसरवू शकतो.

4. मांस खातांना सांभाळा
माकड, चिंपाझी यांचं मासं खाऊ नये, कारण या प्राण्यांचं मास खाल्ल्यानेच मानवात हा रोगाचं संक्रमण झालं, यामुळे काय खायचं आहे, ते व्यवस्थित शिजवलं आहे किंवा नाही हे पाहूनच आपण खाल्लं पाहिजे.

5. घाबरू नका
इबोलाच्या संक्रमणापेक्षा अफवांचं पिक सर्वात वेगाने पसरतंय, अशा अफवांपासून दूर राहिलं पाहिजे, अशा अफवा पसरवल्या जात नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, उपचारांसाठी हॉस्पिटल ही योग्य जागा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.