सलमान खानने 'सिंकदर'च्या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी?

28 डिसेंबरला सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.  टीझरमधील सलमान खानचा लूक आणि डायलॉग पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की सलमानने या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला धमकी दिली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 29, 2024, 11:54 AM IST
सलमान खानने 'सिंकदर'च्या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी?  title=

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी 28 डिसेंबर हा दिवस खूपच खास ठरला आहे. कारण या दिवशी, अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर 1.42 मिनिटांचा आहे. टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. मात्र, टीझरमधील सलमान खानच्या एका डायलॉगने खळबळ उडवून दिली आहे. ज्याचा अर्थ प्रेक्षक आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडत आहेत.

'सिकंदर' चित्रपटाचा टीझर हा सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, मात्र निर्मात्यांनी तो एक दिवस पुढे ढकलला होता. मात्र, टीझरमधील सलमानचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांना आता चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. सलमान खानच्या टीझरमधील डायलॉग जबरदस्त जरी असले तरी 'सिकंदर'च्या टीझरमध्ये सलमान खानने एक डायलॉग बोलला आहे, ज्यावर सलमानने अप्रत्यक्षपणे लॉरेन्स बिश्नोईला प्रत्युत्तर दिल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. टीझरमधील ओळ अशी आहे की, 'बहुत सारे लोग मेरे पीछे पड़े हैं, बस मेरे मुड़ने की देर है'. 

सलमानची लॉरेन्स बिश्नोईला धमकी? 

'सिकंदर' चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमान खानवर हल्ला करण्यासाठी चेहऱ्यावर मुखवटे लावून त्याच्या मागे उभे आहेत. ज्यानंतर अभिनेता सलमान खानचा एक डायलॉग आहे. त्यानंतर सलमान खान त्या सर्वांना मारून टाकतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा हात होता. त्यानंतर अनेक वेळा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून सलमान खानला धमक्या आल्या. ज्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली. परंतु, सध्या 'सिकंदर'च्या टीझरमधील सलमान खानच्या डायलॉगने चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 

टीझरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सलमान खानच्या या डायलॉगचे कारण हे देखील असू शकते की, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून सलमान खानला धमक्या येत होत्या तेव्हा सलमान खान 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाचे शूटिंग देखील कडक बंदोबस्तामध्ये झाले. टीझरमधील सलमान खानच्या डायलॉगवर चाहते देखील कमेंट्समधून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये एका चाहत्याने म्हटले आहे की, 'देख लॉरेन्स तेरा बाप सिकंदर आ गया'. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, ही लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी वॉर्निंग आहे.