पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं आणि उदबत्ती लावण्याचा प्रकार घडला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घडलेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. त्यांनी तिथे जाऊन त्या भिंतीला भगवा रंग दिला. या सगळ्या घटना अत्यंत भयानक आहेत प्रत्येक हिंदू बांधवांनी जागरूक राहावं असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. सध्या अनेक गोष्टी फेक तसचं तर्कहीन सुरू आहेत. या घटनेबाबत आम्ही पोलिसांशीसुद्धा चर्चा केली आहे अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.
"काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप व्हायरल झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री दातेरे यांच्या समवेत हिरव्या रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली," असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
"पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया," असं आवाहनही त्यांनी केलं आहे. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया असंही त्यांनी म्हटलं आहे.
हम भगवा धारी है l
हम श्रीराम पुजारी है llकाल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग… pic.twitter.com/zf0u09f7tq
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) December 28, 2024
सदर जागा कदम कुटुंबीयांच्या मालकीची होती. त्या जागेवर शाळेचे बांधकाम झाले. पूर्वीच्या जुन्या वाड्यात एक पीर होता. इमारत बांधली गेली त्यावेळी तो पीर हटवला गेला. श्रद्धेचा भाग म्हणून कदम कुटुंबातील सतीश कदम यांनी इमारतीच्या भिंतीवर मागील बाजूस हिरवा रंग लावून त्या ठिकाणी पूजाअर्चा सुरू केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी जाऊन भिंतीवरील हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला आणि त्या ठिकाणी रामाची प्रतिमा ठेवली.