Video : डोळ्यात आनंदाश्रू अन् सुनील गावसकरांसमोर नतमस्तक झाले नितीश रेड्डीचे वडील

IND VS AUS 4th Test : तिसऱ्या दिवशी भारतीय टीम संकटात असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतक लगावणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्यला रेड्डी हे स्टेडियमवर दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकरांना भेटले.

पुजा पवार | Updated: Dec 29, 2024, 12:45 PM IST
Video : डोळ्यात आनंदाश्रू अन् सुनील गावसकरांसमोर नतमस्तक झाले नितीश रेड्डीचे वडील title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) चौथा टेस्ट सामना सुरु आहे. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एक भावुक क्षण पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवशी भारतीय टीम संकटात असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतक लगावणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्यला रेड्डी हे स्टेडियमवर दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकरांना भेटले. यावेळी ते अतिशय भावुक झाले आणि थेट गावसकरांच्या पायावरच नतमस्तक झाले. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नितीश कुमार रेड्डीने त्याच्या डेब्यू टेस्ट सीरिजमध्ये भारतासाठी शतक लागवल्यावर त्याच्या कुटुंबाने सुनील गावसकर तसेच रवी शास्त्री इत्यादींची भेट घेतली. मुत्यला रेड्डी हे कुटुंबासोबत जेव्हा गावसकरांना भेटले तेव्हा त्यांनी मला तुमचा स्ट्रगल माहित आहे असे म्हंटले. टेस्टमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले की, 'मला माहितीये की तुम्ही केवढा त्याग केलाय, खूप संघर्ष केलाय. तुमच्यामुळे मी सुद्धा भावुक झालोय. तुमच्यामुळे भारताला हिरा मिळालाय, भारतीय क्रिकेटला हिरो मिळालाय'. 

पाहा व्हिडीओ : 

नितीश रेड्डीचं दमदार शतक : 

नितीश कुमार रेड्डीने शनिवारी मेलबर्नमध्ये चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकले. नितीश मेलबर्न टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग सुरु असताना 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चांगली पार्टनरशिपकरून दमदार शतक झळकावले. नितीशने 172 बॉलमध्ये 104 धावा केल्या असून दरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार ठोकले. टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये जात असताना नितीश कुमार रेड्डीने मैदानात जम बसवला आणि 83 बॉलमध्ये 51 धावा करत अर्धशतक ठोकले. आठव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डीने केलेल्या 127 धावांच्या पार्टनरशिपने भारताचा स्कोअर 300 पार पर्यंत पोहोचवला. नितीश जेव्हा मैदानात आला तेव्हा भारताचा स्कोअर 7 विकेट्सवर  221 धावा होता, पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 9 विकेट्स गमावून 358 धावा केल्या होत्या.

हेही वाचा : IND VS AUS : जशाच तसे! विराटला चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला, पाहा Video

 

नितीश रेड्डीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 -25  च्या पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नितीशला चौथ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. नितीशचा खेळ पाहण्यासाठी आणि भारताला चिअर करण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियाला आले होते. ज्यावेळी नितीशने शतक झळकावले तेव्हा त्याचे वडील प्रेक्षकांप्रमाणे स्टॅन्डमध्ये बसले होते. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.