व्हिडीओ | आजोबांनी जीव धोक्यात टाकून नातीचे प्राण वाचवले

ऑस्ट्रेलियात 62 वर्षाच्या आजोबांनी, जीव धोक्यात घालून, अठरा महिन्याच्या नातीचे प्राण वाचवले आहेत. ही दृश्‍य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: Jul 8, 2015, 10:31 AM IST
व्हिडीओ | आजोबांनी जीव धोक्यात टाकून नातीचे प्राण वाचवले title=

सिडनी : ऑस्ट्रेलियात 62 वर्षाच्या आजोबांनी, जीव धोक्यात घालून, अठरा महिन्याच्या नातीचे प्राण वाचवले आहेत. ही दृश्‍य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

सिडनीमधील वेंटवर्थविल्ले या रेल्वे स्टेशनवर शीख कुटुंबीय तिकीट खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अठरा महिन्यांची चिमुकली होती. लहान मुलांसाठी असलेल्या चाकांची गाडीत तिला बसविण्यात आले होते. मात्र, रेल्वेरुळाच्या दिशेने उतार असल्याने ती गाडी रेल्वे रूळांच्या दिशेने गेली.

प्लॅटफॉर्मवरून चिमुकली रेल्वेरुळावर पडली. हे आजोबांच्या लक्षात आले. वेगाने धावत ते चिमुकलीच्या दिशेने गेले. प्लॅटफॉर्मवरून त्यांनी रेल्वेरुळावर उडी मारली. चिमुकलीला कडेवर घेऊन आईच्या ताब्यात दिले. काही सेकंदातच वेगात रेल्वे धावत पुढे गेली. आजोबांच्या तत्परतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.