नोरफोक : एका 'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मालकानं तब्बल ३० हजार पाऊंड खर्च केल्यात. हा किस्सा आहे नॉर्थ वालशामच्या नोरफोकचा...
वेबसाईट डेलीमेलनं दिलेल्या बातमीनुसार, टोल बार्न वेटनरी सेंटरच्या स्टाफनं माशाला ठिक करण्यासाठी मालकाला ३०० पाऊंडचा खर्च सांगितला. वेटनरी डॉक्टरच्या म्हणण्यानुसार गोल्डफिशला मलत्याग करताना त्रास होत होता.
हा खर्च ऐकतानाच मालकाला पहिल्यांदा धक्का बसला पण नंतर मात्र त्यानं आपल्या लाडक्या गोल्डफिशला वाचवण्याचा निर्णय घेतला. या मालकाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. डॉक्टरांनी या माशाच्या पोटातली एक गाठ उपकरणांच्या साहाय्यानं बाहेर काढली... त्यामुळे, गोल्डफिशचा जीव वाचला. जवळपास ५० मिनिटे हे ऑपरेशन सुरु होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.